Uncategorized

अजय ईटकरे यांची यूपीएससी मधून निवड

रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आला सत्कार

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत होणाऱ्या CAPF परीक्षेमध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नामध्ये २९२ वी रँक घेऊन उत्तीर्ण झालेले श्री अजय बाबाराव ईटकरे हे मूळचे उमरखेड शहरातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण साखळे विद्यालय उमरखेड येथे तर माध्यमिक शिक्षण हे नवोदय च्या माध्यमातून झाले. वडील हे प्राथमिक शिक्षक असल्यामुळे बालपणापासूनच अभ्यासाबद्दल त्यांची करडी शिस्त होती.
माध्यमिक शिक्षणानंतर औरंगाबाद एमआयटी मधून २०१६ साली मेकॅनिक इंजिनीयर ही पदवी संपादन केली.
परंतु प्रशासकीय सेवेत जाऊन जनसामान्याची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी पुणे येथे सुरू केली महत्त्वाचे म्हणजे कुठलेही महागडे शिकवणी वर्गमूळ लावता सेल्फ स्टडी करून ते दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन केले.
त्यांच्या विद्यार्थी जीवनातील संघर्षामध्ये बार्टी संस्थेची फार मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे कुटुंब हे उमरखेड शेअर येथे राहत असून दोन बहिणी व भाऊ, आई – वडील असा संयुक्त परिवार आहे. भाऊ माध्यमिक शिक्षक तर वडील चार वर्षापूर्वी सेवानिवृत्त शिक्षक आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, त्यांचे बंधू शहर संघटक नंदू ईटकरे, प्रल्हाद इटकरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे, प्रवीण सूर्यवंशी, साई पाटील, तालुका संघटक संदीप राऊत, कुणाल दवणे मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते


चौकट :- अजय गोरे यांनी केलेल्या यश संपादनामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थी वर्गाचा स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आश्वासक झाला असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षाकडे वळावे असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!