Uncategorized

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा – पवन मेंढे

पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही..!

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

राज्य सरकारने नुकतेच ०१ जुलै पासून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा. योजनेचा फॉर्म सुलभपणे भरता यावा या हेतूने या योजनेचे अवलोकन करून, मोठे बदल करून प्रक्रिया सुलभ केली आहे. शिवाय अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहान भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे यांनी केले आहे. नवीन बदलानुसार वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे केली आहे, जमिनीची अट रद्द केली, महाराष्ट्र अधिवास (डोमासेल) रहिवासी प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. अविवाहित महिलांचा समावेश करण्यात आला आहे. आता अविवाहित, विवाहित, घटस्पोटीत, परित्यक्ता, निराधार, विधवा या पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजेनेतून दरमहा १५०० रुपयाचा थेट खात्यात लाभ मिळणार आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट फोटो एवढ्या कागदपत्रांच्या आधारावर ऑनलाईन फॉर्म भारता येईल. घरबसल्याच स्वतःच्या मोबाईल मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म (नारीशक्ती दूत) या ॲपवर आपण आपला फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत ग्रामसेवक, तलाठी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणालाही आगाऊ पैसे देण्याची आवश्यकता नाही. कोणी यामध्ये गैरव्यवहार अथवा पैशांची मागणी करत असेल तर, भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!