Uncategorized

ग्रामसभा न घेतल्याने युवक झाले आक्रमक बोंब मारो आंदोलनाचा दिला इशारा

ढाणकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामसभा हा कणा मानला जातो परंतु अकोली येथील सचिव सरपंच हे ग्रामसभा घेण्यासाठी टाळाटाळ करत असून अकोली येथील ग्रामस्थांना कुठल्याही शासकीय योजनेची पुरेपूर माहिती मिळत नाही या अनुषंगाने 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेणे महत्त्वाचे असताना सुद्धा अकोले येथील सचिव व सरपंच हे ग्रामसभा घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहे या मागचे कारण काय असा सवाल समस्त अकोली येथील नागरिकांना पडला आहे शासनाने वर्षातून तीन ग्रामसभा घेणे बंधनकारक असून सुद्धा अकोली ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यासाठी वारंवार टाळत आहेत त्यामुळे अकोली येथील ग्रामस्थ संतप्त होऊन बोंब मार आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायतला दिला आहे आठ दिवसात जर ग्रामसभा नाही घेतली तर अकोली ग्रामपंचायत समोर समस्त ग्रामस्थांच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा सदरील निवेदनात दिला आहे सदरील निवेदनात अनिल राठोड गजानन पवार नवल विजय पवार संतोष पवार यासह अनेक नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button