Uncategorized
दत्तनगर येथील आगीमध्ये होरपळला शेतकऱ्याचा संसार

एस पी दळवी
उमरखेड : तालुक्यातील ढाणकी जवळील दत्तनगर येथे गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बंद घराला भीषण आग लागली.
शेतकरी भीमराव ब्रह्मटेके हे पत्नीसह शेतात गेले असताना त्यांच्या बंद घरातून धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
ढाणकी नगरपंचायतीकडून वेळेत प्रतिसाद न मिळाल्याने उमरखेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत घर जळून खाक झाले होते.
उमरखेड येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी वाजिद हमीद, मंगेश गायकवाड, राजेश कांबळे, लक्ष्मीकांत तळणकर यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आग अपघात आहे की घातपात याचा तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रोशन सरनाईक करीत आहेत.



