Uncategorized
उमरखेड चे सुफिसंत डोंगरेपीर बाबाचा संदल उत्साहात साजरा

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड शहराला सुफी संतांची भूमी म्हणुन ओळख आहे. उमरखेड च्या अनेक भागात सुफी संतांची समाधी स्थिरावली आहे. दरम्यान, काल बकरीद ईदनिमित्त डोंगर पीर बाबाचा उर्स दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा झाला. उमरखेड शहरातील गांधी चौकातून व शहरातील अनेक मार्गातुन मार्गक्रमण करत या संदल मिरवणुकीचा समारोप डोंगरेपीर बाबा यांच्या दरगाह वर करण्यात आला.
या संदल मिरवणुकीत डोंगर पीर बाबांचे शेकडो चाहते सहभागी झाले होते, दरम्यान, संदलमध्ये आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार मुजावर सय्यद वसीम सय्यद इसाक , माजी नगरसेवक सय्यद असफर, शाहरूख पठाण, ताहेर मिर्झा, जमीर खतीब यांनी मानले.
या संदल मिरवणुकीत उमरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर सै.आवेस,सै.सरफराज, सै.मोसिन,सै.अमन, सै.ईमरान,सै.असलम
सै.वसिम आदींनी परिश्रम घेतले
चौकट
“दरवर्षी निघणाऱ्या संदल पेक्षा यावेळी आम्ही DJ मुक्त करून सामजिक संदेश दिला.. पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले “सय्यद अफसर शहराध्यक्ष
एम आय एम
उमरखेड