शहर

उमरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या महासंग्राम मध्ये जनतेने तेजश्री जैन यांना नगरपरिषदेच्या राज सिंहासनावर विराजमान केले.

सहसंपादक शेख मुजाहिद मो. 7798306192

उमरखेड :-
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उमरखेड जनशक्ती पॅनल च्या नगर अध्यक्ष पदाच्या दावेदार ठरलेल्या तेजश्री जैन यांनी आज नगराध्यक्ष पदाचे पद ग्रहण केले.
मागील नऊ वर्षापासून नगरपरिषदेमध्ये अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून या बेताल कारभाराला कंटाळून शहरातील नागरिकांनी जनशक्ती पॅनलच्या रूपाने परीवर्तन केले व नगराध्यक्ष सह 17 नगरसेवक निवडून आणले नागरिकांना तत्परतेने नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी व नगरपरिषद कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत अशी ग्वाही जेष्ठ काँग्रेस नेते नंदकिशोर अग्रवाल यांनी दिली

जनशक्ती पॅनलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व 17 नगरसेवकांचा भव्य पदग्रहण सोहळा थाटात

दि 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जनशक्ती पॅनलची निशानी असलेल्या सजविलेल्या बस ने नगराध्यक्षा तेजश्री जैन व पॅनलच्या 17 नगरसेवकांचे स्थानिक नगर परिषद प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळा कार्यक्रम स्थळी आगमन

झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ काँग्रेस नेते नंदकिशोर अग्रवाल हे होते काँग्रेस नेते तातू देशमुख साहेबराव कांबळे, राम देवसरकर इनायतउल्ला जनाब दत्तराव शिंदे, उमरखेड जनशक्ती पॅनलचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, बाळासाहेब

नाईक, अॅड बळीराम मुटकुळे अजय नरवाडे, राजेश खामनेकर प्रशांत पत्तेवार, सतीश नाईक निलेश जैन राजू कवाने, सुभाष दिवेकर आदींची या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती

. यावेळी तातू देशमुख, इनायत उल्ला जनाब , शेख तालीब, शगीर तन्ना यांनीही आपले विचार व्यक्त केले अॅड संतोष जैन यांनी शहरवासीयांनी दिलेल्या मतदान रुपी आशीर्वादाने लोकशाही जिवंत जिवंत ठेवण्यासाठी केलेला कौल दिलेला कौल सर्वमान्य असून जनतेच्या विश्वासाला कदापिही धडा जाऊ दिला जाणार नाही, चांगल्या कामासाठी

विकासासाठी कटिबध्द : नगराध्यक्ष जैन

शहरातील मतदारांनी जनशक्ती पॅनलला बहुमत मिळवून देत सत्ता परिवर्तन केल्याने नगरपालिकेचा स्वच्छ व पारदर्शक कारभार चालवून शहर वसियांना तत्परतेने नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून जनतेचा विश्वास कायमस्वरूपी संपादन करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्रीताई जैन यांनी पदग्रहण सोहळा प्रसंगी दिली.

विरोधकांचाही सहभाग असावा त्यांच्याही सूचनांचा आदर केला जाईल असे आपल्या प्रास्तविकातून अॅड. संतोष जैन यांनी स्पष्ट केले

या पदग्रहण सोहळा कार्यक्रमात भाजप सोबतची युती तोडून निवडणुकीत उतरलेले शिवसेना

(शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख अॅड संजीवकुमार जाधव व पदाधिकारी उपस्थित झाले होते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन प्रेमराव वानखेडे यांनी तर आभार सिद्धेश्वर जगताप यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button