महागाव नगरपंचायत कडून दिव्यांग कल्याण निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा…. नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर .

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत यांच्याकडून दिव्यांग कल्याण निधी गेल्या तीन वर्षापासून रखडलेला होता .
त्यास प्राधान्य क्रमाने घेऊन दिव्यांग कल्याण निधी वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आलेले आहे याबाबत महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौभाग्यवती सुनंदा दिलीपराव कोपरकर यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी विषय क्रमांक आठ नुसार विषय पत्रिकेवर अजेंड्यावर विषय घेऊन हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे ठरविले होते त्या अनुषंगाने नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक आठ नुसार त्यास मान्यता देण्यात आली व लाभार्थ्यांच्या दिव्यांग कल्याण निधी खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर निधी हा नगरपंचायत निधी अंतर्गत पाच टक्के लाभांश म्हणून देण्यात येत असतो सदर निधीबाबत बजेटमध्ये तरतूद सुद्धा करण्यात आल्याची माहिती महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीपराव कोपरकर यांनी दिलेली आहे. दिव्यांग कल्याण निधी हा नगरपंचायतच्या स्वतःच्या उत्पन्नातून खर्च केल्या जात असतो दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत महागाव शहरातील पहिल्या टप्प्यात 75 लाभार्थ्यांची यादी महागाव येथील भारतीय स्टेट बँक , यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक , व युनियन बँकेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वळती करण्यात येत असल्याची माहिती महागाव नगरपंचायतचे लेखापाल नितीन हरीमकर यांनी दिलेली आहे.
प्रति लाभार्थी 3840 रुपय एवढा निधी देऊ करण्यात आलेला आहे .
सदर निधी टाकण्याची कार्यवाही सर्वसाधारण सभेच्या झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने महागाव नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांच्या मार्गदर्शनात लेखापाल नितीन हरीमकर , लिपिक विष्णू कांबळे यांनी केलेली आहे .
महागाव नगरपंचायत च्या दिव्यांग कल्याण निधी वाटपाच्या अनुषंगाने महागाव नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीपराव कोपरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती .
या बैठकीला प्रामुख्याने महागाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती प्रमोद रामराव भरवाडे , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वीकृत नगरसेवक संभाजीराव नरवाडे , सुजित ठाकूर , करूना नारायण शिरबिरे , विशाल प्रकाश पांडे , रंजना दीपक आडे , सुनिता शिवाजीराव डाखोरे , रामराव काशिनाथ नरवाडे , जयश्री अशोकराव इंगोले , गजानन सोपान साबळे , रूपाली संतोष कोल्हेकर , सुरेखा विनोद कोपरकर , महागाव नगरपंचायत चे काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक शैलेश कोपरकर नगरसेवक महेश गजानन पाटील , आशा शंकर बावणे , जयश्री संजय नरवाडे , परवेज सुरय्या , सुरेश नरवाडे , यांच्यासह अधिकारी , कर्मचारी न प्रामुख्याने प्रामुख्याने उपस्थित होते.
दिव्यांग कल्याण निधीमुळे शहरातील दिव्यांग नागरिकांना देण्यात आलेल्या अनुदानामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे . महागाव शहरातील दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत कोणी लाभार्थी प्रथम यादीतून सुटला असेल तर त्यांनी महागाव नगरपंचायत च्या कार्यालयात रीतसर नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा त्यांनाही दिव्यांग कल्याण निधी चा लाभ व त्यांचा हक्काचा लाभांश देण्यात येणारा असल्याची माहिती यावेळी महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौभाग्यवती सुनंदा दिलीपराव कोपरकर यांनी दिली. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत वाटप करणाऱ्या निधीत एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची जबाबदारी व काळजी घेतल्या जाईल अशी ग्वाही सुद्धा कोपरकर यांनी दिली.



