शेतकऱ्यांच्या व्यथा कोणाला सांगावेमहागाव तालुक्यात शेतकरी निराश अवस्थेत!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात सतत ढगफुटी व पावसाचा कहर झाल्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी निराश अवस्थेत डोक्याला हात मारून निसर्गाला कोपत असल्याची दिसत आहे.दिनांक 13 -9- 2025 रोजी 12 मिलिमीटर पाऊस व मागील 812 मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.कापसाला कुठेही पाती पाहायला मिळत नाही सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.अशा वेळेस शेतकऱ्यांनी दसरा दिवाळी कशी करावी अशा घोर चिंतेमध्ये निराश अवस्थेत शेतकरी झाला आहे.परंतु आजपर्यंत शासनाचे आश्वासन सुद्धा मिळाले नाही शेत पिकाचे पंचनामे करण्यात आले परंतु ज्या शेतात नुकसान झाले नाही अशाही शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असे चित्र पाहायला मिळत आहे .वास्तविक ज्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान द्या अशी मागणी लेवा येथील शेतकरी पंजाब राठोड करंजखेड येथील आत्माराम राठोड यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे त्यावेळेस परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते अशा परिस्थितीत महागाव तालुक्यात शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिवाळीचा सण साजरा करता यावा या उद्दिष्टाने शासनाने मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे.



