Uncategorized
अनाधिकृत लेआउट मधील आरक्षित जागेवरील अनाधिकृत रित्या चालू असणारे बांधकाम तात्काळ बंद करा.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड शहरातील मौजे खंड क्रमांक 1व खंड2 मधील सर्वे नंबर 180/1,180/2,188/1,90 यात पडलेल्या अनाधिकृत लेआउट मध्ये आरक्षित जागेवर अनाधिकृत बांधकाम करीत असल्याने चौकशी करून बांधकाम थांबवावे व योग्य ती कारवाई करावी असे निवेदन संयुक्त पत्रकार संघाकडून मुख्याधिकारी न. प . उमरखेड यांना निवेदन देण्यात आले. याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966चे कलम 52,53,54 अंतर्गत फौजदारी कारवाई करून सदर बांधकाम तात्काळ थांबवून जेवढे बांधकाम झाले ते पडून योग्य ती उचित कारवाई करावी अन्यथा या अनुषंगाने व न.प.च्या अंतर्गत अजुन दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.