Uncategorized

तेलंगणातून येणारा गुटखा जप्त

19 लाखाचा गुटखा वाहना सह जप्त : अन्न व औषध प्रशासन विभागाची धाडसी कारवाई

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विदर्भात येत असून तो रोखण्यासाठी आता अमरावती विभागीय पातळीवरील अन्नसुरक्षा विभाग सक्रिय झाला असून काल याच विभागाने हादगाव उमरखेड रोडवर सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एका वाहनाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये 48 गोरी सुगंधी तंबाखू पान मसाला आढळून आला. तीस मे रोजी अन्नसुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी अन्य सुरक्षा अधिकारी दक्षता यांच्या पथकाने हदगाव उमरखेड रोडवर सायंकाळी चार वाजता माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा रचला आणि आदीलाबाद
तेलंगणा येथून सुगंधी तंबाखू घेऊन येणारे वाहन महिंद्रा बोलेरो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात 48 बोरी सुगंधी तंबाखू पान मसाला आढळून आला आहे या वाहनाचा क्रमांक टी एस झिरो एक यु ए 33 20 असा आहे संबंधित वाहन या रोडने येत असतानाच या मार्गावर असलेल्या पथकाने आपल्या पथकाला मोबाईल वरून माहिती देत सतर्क केले आणि अलगद हे वाहन या रोडवर पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन पळून जाण्याच्या तयारी रस्तांनाच त्याचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले या वाहनाचा चालक शेख समीर हुसेन वय वर्षे 25 राहणार आदीलाबाद
तेलंगणा हा असल्याचे सांगण्यात आले अन्न सुरक्षा पथकाने ताब्यात घेतलेला पान मसाला पंचनामा करून तो पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे सुपविण्यात आला तर पानमसाला मात्र याच विभागाने आपल्याकडे ठेवला यात अन्नसुरक्षा विभागाने पोलिसांकडे तक्रार नोंदविली पोलिसांनी या आरोपी विरुद्ध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे पोलिसांनी मालाचा पंचनामा करून बाराशे एक किलो तसेच पान मसाला आणि वाहन असा 19 लाख 35780 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चौकशीत घेतला आहे

       चौकात 

विभागीय अन्नसुरक्षा विभागाची कारवाई? स्थानिकांचे काय ?

यवतमाळ येथील अन्नसुरक्षा विभाग अलीकडे कामकाज करण्यामध्ये कमी पडतो की काय अशी शंका आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना येऊ लागली आहे त्यामुळेच वरच्या स्तरावरूनच आता कारवाई करण्याचे धाडस केल्या जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button