Uncategorized

ब्राह्मणगाव ते शिंदगी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत कामात करोडचा अपहार

[ डाबंर वितळविण्या करिता लिबांच्या व इतर झाडाची कत्तल ]शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

तालुक्यातील ब्राह्मणगाव ते शिंदगी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या तसेच विद्यार्थ्यां च्या सुखसोयी करिता सदर रस्त्याकरिता टेडंर ज्या कंपनीला भेटले आहे. कामाची सुरुवात केली असून सदर ठेकेदार आपल्या मन मर्जीप्रमाणे तसेचअधिकाऱ्याना हाताशी धरून आपल्या मन मर्जीप्रमाणे रस्त्याची निर्मिती करीत आहे. सदर रस्त्याची पाहणी केली असता ठेकेदारांनी आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून सदर रस्त्यालगतचे लिंबाची मोठ मोठी झाडे बुडा सहीत व इतर प्रकारची विकासाच्या नावाखाली तोडून सदर ठेकेदार आपल्या अकलेचे धिंडवडे काढून त्या झाडांना तोडून त्याचे जळतन निर्मिती करून डांबर वितळविण्यास वापर करीत आहे. सदर ठेकेदारांनी शासनाच्या नागरिकांच्या डोळ्यात धुळ झाकून जळतनाचा झाडांचा वापर राजरोसपणे करीत आहे. तसेच ठेकेदारांनी परत आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून त्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या विहिरीच्या आजूबाजूचा असलेला मांजरा खडक हा रस्त्यावर गिट्टी म्हणून रस्त्यावर टाकून शासनाला लाखो रुपयांनी गंडवीत असल्याचे आज धडधडीत नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या नजरेत येत आहे. त्या भागातील काही नागरिकांनी त्या बाबत विचारणा केली असता तर ठेकेदारांच्या उडवा उडविचे उत्तरे देऊन माझे कुणीच काही वाकडे करीत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सदर भागातील ठेकेदाराबाबत आपला संताप आक्रोश व्यक्त करीत आहेत. सदर रोड कसल्याही प्रकारचे गुणनियंत्रण बाजूला ठेवून आपल्या मनमानी कारभारांनी रस्त्याची निर्मिती करून आपले देयके प्राप्त करून घेण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसते. सदर रस्त्याची पाहणी केली असता सदर ठेकेदारांनी पाण्याचा अत्यल्प वापर करून तसेच वनविभागाच्या कायद्यानुसार परवानगी घेतली काय ? रस्त्यालगत असलेले झाडांची कत्तल करून वापर करीत असल्याचे दिसून येत आहे .सदर वनविभाग ठेकेदारावर कसल्या प्रकारची कारवाई करणार त्याबाबत जनतेमध्ये चर्चिल्या जात आहे. सदर ठेकेदारांनी आपल्या मनमर्जीतल्या असलेल्या अधिकाऱ्यांशी आपले हितसंबंध जोपासून अधिकाऱ्यांना त्याकडे लक्ष घालण्यापासून वंचित केले. असल्याचे दिसून येत असले तरी जनतेच्या डोळ्यात धुळ झाकू शकत नाही अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत व नागरिकांनी जनतेने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करू सदर कामाची चौकशी करू ठेकेदारावर गुन्हे दाखल करू त्यांचे देयके काढण्यात येऊ नये व गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी सदर कामाची पाहणी करावी. सदर ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकुन ठेकेदारी लायसन रद्द करावे ही मागणी जनतेत होत जोर घरीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!