शहर

महागाव तालुक्यात गैरपात्रांना मिळतोय राशन धान्य? — उत्पन्न पडताळणीची गरज तीव्र; पुरवठा विभागाची मोहीम सुरू

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात सध्या काही लाभार्थी वार्षिक उत्पन्न पात्रतेपेक्षा जास्त असूनही स्वस्त धान्य मिळवत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा विभागाने प्राथमिक तपासणीदरम्यान अशा अनेक गैरपात्र लाभार्थ्यांची नावे यादीत आढळली असल्याचे उघड झाले आहे.

तहसीलदारीमार्फत गावस्तरावर घेतलेल्या अर्जांसोबत काही नागरिकांनी बोगस उत्पन्न दाखले जोडून राशन कार्ड कायम ठेवले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील खऱ्या पात्र कुटुंबांचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

याशिवाय, रोजच्या धान्याची काळाबाजारात विक्री होत असल्याची माहिती समोर आली असून, गावांमध्ये छोटे व्यापारी गाड्यांवर फिरून तांदूळ व गहू विकत घेतात, अशी तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तालुक्यात व्यापक शोध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात:
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न,
उत्पन्न दाखल्यांची सत्यता,
कुटुंबाचा आर्थिक गट,
धान्याचा प्रत्यक्ष उपयोग
यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे.

गैरपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे राशन कार्ड तात्काळ अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महागाव तालुक्यातील वाढत्या अनियमिततेमुळे पात्र कुटुंबांना मिळणाऱ्या धान्याचा अपव्यय व काळाबाजार वाढला असून, यावर अंकुश आणण्यासाठी पुरवठा विभागाचे पथक पुढील काही दिवसांत गावोगावी तपासणी मोहीम तीव्र करणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button