ब्रेक फेल झाल्याने दारू घेवुन जाणाऱ्या ट्रकचा अपघात

नांदगव्हाण घाटातील घटना, सुदैवाने प्राण हानी टळली
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
विदेशी दारू घेवुन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना आज रविवार (दि१९मे) रोजी सकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान नांदगव्हाण घाटात घडली सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
बारामती येथुन यवतमाळ येथे महागड्या विदेशी दारू घेवुन जाणाऱ्या ट्रक क्र.१२ केपि ८४४१ हा ट्रक रविवार (दिनांक १९मे) रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान नांदगव्हाण घाटात आल्यानंतर ट्रक मध्ये तांत्रिक बिघाड होवुन ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले ट्रक भरधाव धावत असल्याने ट्रक मधील चालक व क्लिनर यांनी आपण जिवंत वाचणार याची आशा सोडली होती परंतु चालकाने प्रसंगावधान राखत घाटात महामार्गाच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यावर ट्रक चढविला त्यामुळे ट्रक पलटी होवुन पुढील अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त ट्रकचा पंचनामा केला असुन पुढील तपास जमादार व्यवहारे करीत आहेत.