Uncategorized

पोलीस स्टेशन बिटरगांव मौजे-निंगनुर परिसरात अग्नीशस्त्र (गावठी बनावटी देशी कटटा) बाळगणा-या दोघांस घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 13/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड येथे हजर असतांना मुखबीरव्दारे माहीती मिळाली कि, इसम नामे-सय्यद समीर सय्यद मुस्ताक रा. गढीवार्ड पुसद यांच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असून तो पोलीस स्टेशन उमरखेड हददीत उमरखेड नाथ चौक परिसरात आहे. अशी गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार उमरखेड येथे रवाना झाले. माहेश्वरी येथे दोन

पंचाना बोलावून पंचासह नमूद इसमांचा उमरखेड येथे शोध घेत असतांना एक इसम उमरखेड नाथ चौक परिसरात संशयीतरित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- सय्यद समीर सय्यद मुस्ताक वय 25 वर्षे, रा. गढीवार्ड पुसद असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेवून गावठी पिस्टल बाबत विचारपूस केली असता सदरची पिस्टल त्याचा ओळखीचा

मित्र मुतलीफ खान आश्रफ खान रा.निंगनुर यांच्याकडे दिलेली असल्याचे सांगितल्याने पंचा समक्ष निगनूर येथे जावून इसम नामे मुतलीफ खान आश्रफ खान वय 27 वर्षे, रा. निगनूर यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्टल (कटटा) व तिन काडतुस मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करुन ताब्यात घेतली. सदर पुढील कारवाई करीता दोन्ही आरोपी व जप्त मुददेमाल देशी बनावटीची पिस्टल (कटटा) व काडतुस पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पवन बन्सोड सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सा, पोलीस निरीक्षक श्री. आधारसिंग सोनोने, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि धनराज हाके, शरद लोहकरे, चापोउपनि रेवण जागृत, सफी/बंडू डांगे, पोहवा / प्रशांत हेडाउ, पोहवा/निलेश राठोड, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. 7/5/24

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!