हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्ग बनले अपघातांचे केंद्र

माहामार्गाला मोठ्या प्रमाणात भेगा संबंधित अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष
नांदेड जिल्हा प्रतिनिधी अजिम हिंदुस्तानी
सोनारी फाटा, सोनारी ते हिमायतनगर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असुन अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे..
भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१अ या महामार्गाचे काम मागील सहा सात वर्षांपूर्वी शारदा कंट्राक्शन च्या ठेकेदाराला देण्यात आले होते त्याचप्रमाणे भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम शारदा कंट्राक्शन च्या वतीने पुर्ण पणे काम जवळपास मागील चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आले आहे परंतु,
या महामार्गाचे काम शारदा कंट्राक्शन च्या ठेकेदाराने काही काम मनमानी कारभार करत अतिशय निष्कृट दर्जाचे केल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सोनारी ते हिमायतनगर दरम्यान असलेल्या या महामार्गावर जागोजागी मोठमोठे भेगा पडल्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकासह अनेक वाहनधारकांना कसरत करावी लागत असुन याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे जवळपास मागील चार ते पाच महिन्यांपासून सोनारी ते हिमायतनगर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत मात्र संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे सोनारी ते हिमायतनगर दरम्यानच्या प्रवासात मागील काही दिवसांत अनेक अपघाताच्या घटना घडली असून सुद्धा या महामार्गाचे ठेकेदार किंवा अधिकारी झोपेतून जागे होत नसल्याचे दिसून येते आहे तरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून या महामार्गावर पडलेल्या भेगा चांगल्याप्रकारे दुरुस्ती करून होणाऱ्या अपघात व वाहनधारकांची कसरत थांबवण्याची मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे,