मत मोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड दि. 21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन इमारत एमआयडीसी परिसर लिंबाळा मक्ता जिल्हा हिंगोली येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाच्या वेळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सर्व बाबींची माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी कक्षामध्ये कोणालाही भ्रमणध्वनीचा वापर करता येणार नसल्याचे सांगितले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, महागावचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर, नायब तहसिलदार वैभव पवार, नायब तहसिलदार आर एम

पंधरे, मंडळ अधिकारी संजय वाघमारे, मंडळ अधिकारी संजय नरवाडे, वसंत बोदगिरे यांच्या उपस्थितीत आज तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशिक्षण पार पडले.