Uncategorized

सय्यद कय्युम हज यात्रेसाठी सहकुटूंब रवाना

श्री शिवाजी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्या प्रवासाच्या शुभेच्छा


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192



प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हज यात्रा जीवनात हा सुवर्णयोग आणण्यासाठी खूप कष्ट सहन करावा लागतात त्यामागे त्याची त्यागाची प्रामाणिक तेची भावना असते उमरखेड येथील सय्यक कयूम हे श्री शिवाजी विद्यालय पोफळी येथील लिपिक या पदावर कार्य करीत असतात त्यांना यावर्षी हज यात्रेला जाण्यासाठी नंबर लागल्यामुळे शनिवारी दिनांक ११ मे रोजी आपल्या परीवारासह हैद्राबाद येथे रवाना झाले . त्यांच्या सोबत कासम अली खाँजा ठेकेदार, अकील ठेकेदार हे सुद्धा हज यात्रेसाठी रवाना झाले त्या ठिकाणाहुन ते विमानाने मक्का मदीना हजसाठी रवाना होतील . पोफाळी येथे झालेल्या कार्यक्रमात विष्णू सादुडे, एस.टी . सुर्यवंशी, गणेशराव शिलार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी कय्युम बाबू यांनी आपण सर्वांनी ईश्वरचरणी माझी हज यात्रा सुखरूप होण्याची प्रार्थना करा अशी विंनती केली व शाळेतील स्वयंपाकी लता पुरी व गायत्री पुरी यांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी श्री शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्य अंजलीताई एकबोटे, पर्यवेक्षक विष्णू सादुडे, रवि शिलार, प्रविण सुर्यवंशी, प्रा देवसरकर यांचे सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचा तसेच गुणवंतराव देशमुख सवनेकर गुरुमाऊली ऑनलाईन सर्विसेस पुसद यांनी सुद्धा त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!