अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर महागाव पोलिसांची कारवाई

५ लाखांचा टिप्पर, १६ हजारांची रेती जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर महागाव पोलिसांनी कारवाई करून ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एमएच ३१ सीबी ४८०८ क्रमांकाचा टिप्पर व दोन ब्रास रेतीचा समावेश आहे.
६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता रामराज्य चौकात हा टिप्पर आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे यांनी चालक वामन हीरामण चव्हाण (४७), रा. शेलू, ता. पुसद याची चौकशी केली असता त्याच्याकडे रेती वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. फुलसावंगी नदीपात्रातून रेती आणल्याची माहिती त्याने दिली.
टिप्पर मालक फिरोज खान पठाण (४५) व अमोल राजवाडे (४२), रा. महागाव यांच्यासह चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



