Uncategorized

ब्राह्मणगाव येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील तेजमल गांधीं विद्यालय येथे शिकत असलेल्या एका (१६ )वर्षीय तरुणीवर आपल्याच गावातील एक तरुण आरोपी पवन बबन वाठोरे वय (२५ वर्ष) याचे गेल्या वर्षभरापासून एकतर्फी प्रेमप्रकरण होते. तो शाळेत जात असतांना या मुलीच्या नेहमी मागे लागायचा, ती मुलगी त्याला टाळाटाळ करायची, परंतु त्या मुलाच्या अत्याचाराला कंटाळून ती मुलगी शाळेत न जाता घरीच थांबायची आणि तो मुलगा तिच्या घराच्या आजूबाजूला फिरायचा व तो म्हणायचा की तू मला आवडतेस व माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत झाडाखाली चल असे म्हणायचा, त्यावर ती मुलगी म्हणायची की माझ्या मागे लागू नको, तर तो म्हणायचा की माझ्यासोबत बोल परंतु ती त्यास नकार द्यायची. ही घटना कोणालाही सांगितली तर माझी आई मलाच मारेल या धाकाने तीने पवनचे कृत्य घरातील कोणाला सांगितले नाही.

एके दिवशी दिनांक ३०/०४ /२०२४ रोजी तिची मोठी बहीला पाहुणे बघण्याकरिता येणार होते. त्यामुळे तिच्या घरी तिचे मामा , मावश्या , बहीण, भाऊजी असे घरी आले होते. दुपारी पाचच्या सुमारास ती घरातील झाडझूड करत होती. घरातील सर्व लोक बाहेर अंगणात बसले होते व तिच्या घराला मागून दरवाजा आहे व ती झाडून करण्यासाठी तिने तो उघडला होता व घरात झाडत असताना पवन हा तिच्या घरात आला व तिला मागून पकडले व बाजेवर चल म्हटले व तिच्या अंगावर घातलेला ड्रेस फाडला व अश्लील चाळे करु लागला . घाबरून ती जोर जोरात ओरडू लागली. त्यामुळे तिची आई व मावशी लगेच घरात आल्या व तो मागच्या बाजूने पळून जाताना म्हटला की तुला पाहुण पाहून घेतो तुझ्या घरी कोणी नसताना तुझी इज्जत लुटतो व सगळ्या गावात तुझी बदनामी करतो अशा धमक्या देऊन पळून गेला. त्याच्या अशा कृत्यामुळे मला लज्जास्पद वाटले. या सर्व गोष्टीमुळे तिला मानसिक व शारीरिक त्रास होऊ लागला तीच्या बहिणीची सोयरीक तुटली त्यामुळे तिच्या मनात बरे वाईट विचार येऊ लागले त्या प्रकारामुळे ती एवढी घाबरली होती की तिला कोणास काय बोलावे काही सुचत नव्हते व वारंवार पवनने दिलेली धमकी आठवत होती . तीची प्रकृती अस्वस्थ वाटत होती त्यानंतर तिची मावशी व घरातील थोरले मंडळींनी तिला सावरले व त्यामुळे मी आज पोलीस स्टेशनला येऊन सर्व कृती हे पोलिसांना सांगितले आणि त्या अंतर्गत आरोपी पवन बबन वाठोरे याच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये खालील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ३५४ अ (१), ३५४ ब ३५४ ड, ४५२ , भां.द.वि ५०६ सह कलम ०८, १२ लैंगिक अपराधापासूनचे बालकांचे संरक्षण( पोक्सो)अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. करिता पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!