भीम टायगर सेनेचा दणका…!राम देवसरकर आणि डॉ. या.मा. राऊत संविधान अवमान केल्याप्रकरणी केली आरोपी..!

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
(संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाची यशस्वी सांगता.)
उमरखेड (दिनांक २२ मे) भीम टायगर सेना उमरखेड यवतमाळ यांच्या वतीने आज दुपारी ४ वाजता संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती.
सदर आमरण उपोषण मंडपाला दादासाहेब शेळके यांनी प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी दादासाहेब शेळके यांनी ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या सोबत सकारात्मक व कायदेशीर चर्चा करून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष राम अनंतराव देवसरकर आणि डॉ. यादवराव मारोतराव राऊत यांच्यावर भारतीय संविधानाचे अवमान केल्या प्रकरणी उशिरा का होईन पण अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
फक्त अडीच तासामध्ये भिम टायगर सेनेच्या दणक्याने गुन्हा दाखल होऊन आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
या आमरण उपोषणाला शाम माधव धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) आणि कैलास अशोक कदम (तालुका अध्यक्ष उमरखेड) हे बसले होते.
चौकट:- भारतीय संविधान प्रत देऊन पत्रकार यांच्या सत्कार केला होता पण हा संविधानाचा प्रचार प्रसार नव्हता तर संस्था अध्यक्ष आणि संस्था सचिव यांनी संविधान प्रत मध्ये स्वतःचे फोटो टाकून हा महाविद्यालयाचा प्रचार करायचा उद्देश होता. म्हणून संस्था अध्यक्ष व सचिव यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना).
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्रमांक ३१०/२०२५ राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ अ नुसार गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यात महाविद्यालयाचे अध्यक्ष राम देवसरकर आणि सचिव डॉ या.मा. राऊत यांना आरोपी केले आहे.
तसेच अजाज प्रतिबंधक कायद्याचे कलम लावणे संबंधाने केलेली मागणी संदर्भात वरिष्ठ व विधीतज्ञांशी चर्चा व मार्गदर्शक घेऊन तपासात तसे निष्पन्न झाल्यास पुढील कलम वाढीव अनुषंगाने कारवाई करण्यास येईल. असे लेखी पत्र ठाणेदार शंकर पांचाळ यांनी उपोषणकर्ते यांना दिले आहे.
यावेळी सिंघम ढगे,करण भरणे जिल्हा उपाध्यक्ष, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष, संदीप विणकरे, डॉ.आयुब पठाण, पत्रकार प्रसेनजीत दिवेकर, पत्रकार शेख इरफान, पत्रकार सतीश कोल्हे, पत्रकार शेख निसार इत्यादी अनेक भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:- मागील अनेक दिवसापासून गो.सी गावंडे महाविद्यालयाकडून भारतीय संविधानाची मोडतोड व अवमान करणाऱ्या राम देवसरकर संस्थाध्यक्ष आणि डॉ .या.मा. राऊत यांना संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी सह आरोपी केल्यामुळे हा भारतीय संविधानाचा विजय आहे.
आमचे मार्गदर्शक संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांनी आमच्या आमरण उपोषणाच्या मंडपाला प्रत्यक्ष रुपी भेट देऊन संविधानिक मार्गाने हा लढा आज आम्ही जिंकला आहे. – शामभाऊ धुळे (उपोषणकर्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष भिम टायगर सेना यवतमाळ)