उसाचा ट्रॅक्टर ऑटोवर उलटला; तिघे जखमी

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड (वा.). येथील बसस्थानकासमोरील नांदेड रोड ऑटो पॉइंटवर रात्री 11 वाजताच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ऑटोवर उलटल्याने ऑटोचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनेमुळे वर्दळीच्या बसस्टॅण्ड परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

हदगावकडून पोफाळी येथील वसंत साखर कारखानाकडे जात असलेली ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली येथील स्थानिक बसस्थानक समोरील ऑटो पॉइटवर उभ्या असलेल्या तीन ऑटो रिक्षावर उलटल्याने ऑटोत बसलेल्या चालकांना गंभीर दुखापत झाली. वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र. एम. एच. 38 ए डी 5363 हा भरधाव वेगाने जात असताना मद्यधुंद चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली ऑटो पॉइटजवळ उलटली. यात ऑटोचालक झहीर खान
यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर बबलू पठाण व सय्यद सलीम या दोन ऑटो चालकांना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

उसाची ट्रॉली ऑटोवर उटल्याने सय्यद
सलीम यांचा ऑटो क्र एम एस 26 टी 5116, बबलू पठाण यांचा ऑटो क्र. एम
एच 26 टी 8671 तर जहीर खान यांच्या ऑटो क्र. एम एच 29 ए एम 0660 मोठे नुकसान झाले आहे.
ऊसाची ट्रॉली घेऊन वाहतूक करणारा चालकाचे नाव अंकुश कोळेकर (रा.. सापळी ता. कळमनुरी) असे असून घटनेची फिर्याद शगीर खान मुनवर खान (रा. उमरखेड) यांनी दिली आहे.