Uncategorized

एलसीबीकडून देशीकट्ट्यासह दोघांना अटक

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशीकट्ट्यासह दोघांना अटक केली. ही कारवाई बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंगनूर येथे केली.

सय्यद समीर सय्यद मुस्ताक (२५) रा. गढी वॉर्ड, पुसद, मुतलीफ खान आश्रफ खान (२७) रा. निंगनूर अशी आरोपींची नावे आहेत. एलसीबीचे पथक उमरखेड येथे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एक इसम देशी बनावटीच्या पिस्टलसह उमरखेड येथील नाग चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्याने देशीकट्टा मित्राला दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी निंगनूर गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला देशीकट्टा व तीन काडतूस आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपींसह बिटरगाव पोलिसांच्या ताब्यात दिला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन गजभारे, पीएसआय धनराज हाके, शरद लोहकरे, रेवण जागृत, बंडू डांगे, प्रशांत हेडाऊ, निलेश राठोड, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!