शहर

हिमायतनगरमध्ये दुपारी २ वाजता पावसाची जोरदार हजेरी; ४०°C चा चटका आणि धुळीपासून सुटका


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आज दुपारी ठराविक २:०० वाजता हिमायतनगर शहरात पावसाने अचानक जोरदार एन्ट्री केली. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४०°C पर्यंत पोहोचल्याने आणि वाऱ्यासोबत उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिक आणि व्यापारी कमालीचे हैराण झाले होते. या पावसाने हवेत गारवा निर्माण करून धुळीचे लोट शमवले आहेत.
​या प्रसंगी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष शेख युसूफ यांनी समाधान व्यक्त करत खुदाचा शुक्र अदा केला. ते म्हणाले की, “हा पाऊस केवळ मानवासाठीच नाही, तर मुक्या प्राण्यांसाठी आणि तहानलेल्या पक्ष्यांसाठी खुदाची मोठी रहमत आहे. भीषण उष्णतेमुळे सर्व सजीव धूपमध्ये होरपळून निघाले होते, त्यांना या पावसाने मोठा आधार दिला आहे.”
​भर दुपारी आलेल्या या सरींनी उकाड्यापासून सर्वसामान्यांची सुटका केली असून, पावसाचा हा पहिला इशारा अत्यंत दिलासादायक मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button