पुरबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष- माणिकराव ठाकरे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड ;- इसापूर धरणाच्या पाणी सोडण्याची पद्धती नियोजनशुन्य कुचकामी असल्यामुळे नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसला आहे .पळशी गावातील परिस्थिती अत्यंत विदारक आहे . आपदग्रस्तांसाठी शासनाची अद्याप मदत पोहोचलेली नाही .महापुरात अडकलेल्या लोकांना मदतीची नितांत गरज असून काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मदत करणार असून शासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची एक लाख रुपये हेक्टर प्रमाणे मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवार दि . 20 ऑगस्ट रोजी केली .त्यांनी तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा केला . या दरम्यान पुराचा वेढा असलेल्या पळशीसह मार्लेगाव चातारी दराटी या चार गावातील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व असाहाय्य झालेल्या पूरबाधीतांना शेतपिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी बाबत हेक्टरी एक लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्याची आमची सरकारकडे मागणी असल्याचे त्यांनी पुरग्रस्तांना सांगितले . यावेळी नदीकाठच्या पूरबाधित गावातील नागरिकांना हाताला काम नाही ,शासनाने मजुरांना काम देऊन त्यांना रेशनचे धान्य लवकरात लवकर मिळावे , शेकडो घरांची पडझडअनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत .याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले .मार्लेगाव व पळशी येथील गावकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर बोलून दाखविल्या त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते सदैव तुमच्या पाठीशी असून तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगून त्यांचे सांत्वन केले . यावेळी या पाहणी पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या समवेत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव तातू देशमुख माजी बांधकाम सभापती रामदेव सरकार तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल सोनू खतीब प्रेमराव वानखेडे ख्वाजा भाई कुरेशी अनिल कदम अंबादास धुळे अतुल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.



