Uncategorized

उमरखेड येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड: आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था शाखा उमरखेड जिल्हा यवतमाळ तर्फे महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना एकत्रित आणून त्यांनी पर्यावरण पूरक असे प्रॉडक्ट तयार केले त्याबद्दल त्यांना मार्केटिंग कसे करायचे याबद्दल संस्थेच्या महिलांनी मार्गदर्शन केले, तसेच त्यांनी गायीच्या शेणापासून गोमूत्रापासून आणि कडुलिंबापासून वेगवेगळ्या सुवासिक फुलांपासून धूपकांडी गोवऱ्या तसेच वेगवेगळे पदार्थ जसे की इडलीचे पीठ ढोकळ्याचे पीठ पापड या पद्धतीचे पदार्थ तयार केले परंतु त्यांना मार्केटिंग कसे करायचे याची कार्यक्षळा नैसर्गिक पर्यावरण संवर्धनच्या उमरखेड शाखेच्या टीमने आज नागेशवाडी येथील बचत गटाला समजावून सांगितले तसेच पर्यावरणाचे रक्षण कसं करायचं प्रत्येकाच्या घरासमोर दोन तरी झाडे लावल्या गेली पाहिजे याबद्दल सुद्धा अलकामुडे यांनी माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ जिल्हा महिला संघटिका अलका मुडे यांनी केले होते. यावेळी यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष माधुरी देशमुख, उमरखेड तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष वर्षा चीरडे ,महिला जिल्हा संघटिका कल्पना पांडे, उमरखेड तालुका संघटिका अनुसया मुडे उमरखेड तालुका सचिव उषा तास के आणि उमरखेड तालुका मार्गदर्शिका रोहिणी चक्करवार काकू या उपस्थित होते तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या या बचत गटामध्ये ज्यांनी ज्यांनी पर्यावरण पूरक प्रॉडक्ट तयार केले त्यांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलकाताई मुंडे यांनी केले तर आभार उषा तासके यांनी मानले*.
=—–========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!