भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्षयांचा सत्कार

रिपब्लिक सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश
उमरखेड तालुक्यातील मच्छीमार हे दैनंदिन मच्छी विक्रीसाठी उमरखेड येथील मच्छीमार्केट वर पूर्णता अवलंबून असून, सदरील मार्केटमध्ये मच्छी विक्रेते मच्छी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु मच्छी मार्केट हे मोडकळीस आल्यामुळे त्यांना मच्छी विक्री करणे सुद्धा शक्य होत नसल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. उमरखेड तालुक्यातील भोई समाज बांधव बेरोजगारीच्या व कर्जबाजारीच्या विळख्यात सापडले होते.
रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मागील दोन वर्षापासून संबंधित विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
अखेर जनशक्ती पॅनलच्या उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांच्या पुढाकाराने उमरखेड मच्छी मार्केटमध्ये काँक्रिट बेड, टिन शेड व मुख्य गेट यांची निर्मिती करून इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात भोई समाज बांधवाच्या वतीने नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. उपाध्यक्ष राजू आगीरे, गजानन भोयर, भावराव भोयर, सकाराम राकडे, काशिनाथ आगिरे, देवराव राकडे, विजय राकडे, उमेश राकडे, नारायण राकडे, श्रीराम आगिरे, संजय कामरे, सुरेखाबाई कामरे, मुनेश्वर राकडे, रामदास राकडे, लक्ष्मण राकडे, माधव राकडे, देविदास राकडे, अंबादास राकडे, गणेश आगीरे, अंकुश आगीरे, मुकुंदा राकडे, रामदास आगिरे, गजानन राकडे, शामराव आगिरे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



