शहर

प्रो डॉ अनिल काळबांडे यांचा गावंडे महाविधालयात सत्कार –

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड : तालुक्यातील मिलिंद महाविधालय मुळावा चे मराठी विभाग प्रमुख ‘ प्रसिद्ध साहित्यिक तथा समाजसेवि पत्रकार प्रो डॉ अनिल काळबांडे यांना या वर्षाचा आघवृतपत्र संपादक दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या जन्मगावी पौभूर्ल येथे देण्यात आलेला ‘ राज्यस्तरीय दर्पण पत्रकार पुरस्कार विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आल्यामुळे गो सी गांवडे महाविघालयाचे प्राचार्य डॉ माधवराव कदम यांनी महाविघालयाचे माजी विद्यार्थी म्हणून डॉ काळबांडे यांचा पृष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी मराठी विभाग प्रमुख डॉ विठ्ठल जिवतोडे, डॉ पी डी जाधव , प्रा आय वाय खान, डॉ एन डी जांभेकर , डॉ किशोर नवसागरे , डॉ विनायक इंगळे उपस्थीत होते . या वेळी बोलतांना डॉ काळबांडे यांनी महाविघालयातील शिक्षण घेत असतांना च्या आठवणी सांगून माझ्या यशा मध्ये या महाविघालयातील शिक्षकांचे फार मोठे योगदान संस्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली . (सोबत फोटो – डॉ काळबांडे यांचा सत्कार )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button