Uncategorized

हिंगोलीच्या हळदीला मिळाले जीआय (GI) मानांकन..!!

ता प्रतीनीधी बालाजी पाटील

हिंगोली जिल्हाच्या हळदीस आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे भौगोलिक मानांकनातून नितीन हळदीला आता जगभर ओळख मिळणार आहे माझी खासदार हेमंत पाटील मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश आहे..

हिंगोली जिल्ह्यात हळद लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्यापासून शेतकरी दर्जेदार उत्पादनही काढतात. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळावी तसेच हळद उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंगोली हळदीला भौगोलिक मांनाकन मिळवण्यासाठी माजी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले होते.

याचे फलित म्हणून वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत विभागाने काल प्रदर्शित केलेल्या यादीत हिंगोली जिल्ह्याच्या वसमत हळदीसह इतर ६ कृषि उत्पादकांना भौगोलिक मांनाकन प्राप्त झाले आहे.

कृषीसह विविध उत्पादनासंबंधित भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे.आतापर्यंत मिळालेल्या भौगोलिक निर्देशांकामध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने वसमत येथील हळदसह इतर ६ जीआय उत्पादनांची भर पडली आहे.

महाराष्ट्राला अशा प्रकारे मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा प्रकारचे मानांकन कोणत्याही राज्यासाठी भूषणावह असते. ज्यामुळे राज्याच्या परंपरा, अभिमानास्पद गोष्टी, इतिहास, परंपरा, संकेत यांची पुष्टी होते.

दि.२० ते २४ जूलै २०२३ या कालावधीत ग्रेटर नोएडा येथील भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत यांनी सहभाग नोंदवला‌ होता.

हिंगोलीच्या हळदीला मिळालेल्या भौगोलिक मांनाकनामुळे जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या दर्जेदार हळदीला जगभर ओळख निर्माण झाल्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या हळदीला भाव मिळेल व हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून जागतिक पटलावर येईल यात दुमत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!