गोदावरी फाउंडेशन आयोजित अर्थसाक्षरता आणि ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न; महिलांचा उदंड प्रतिसाद

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
गोदावरी अर्बन बँक शाखा उमरखेड आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथे नुकताच अर्थसाक्षरता अभियान आणि ग्राहक मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.
काळ बदलत चालला आहे. जीवन सहज, सोपे, सजग आणि सेफ होण्यासाठी महिलांनी अर्थ साक्षरतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंब आणि संसाराचा ताळमेळ घालत महिलांनी विविधांगी शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःचा व्यवसायातून उत्पन्न वाढ करायची असेल तर मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही फसव्या आमिषाला बळी न पडता महिलांनी सजग होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. यातूनच आपला सामाजिक आणि आर्थिक साधत एक नवे पाऊल टाकावे असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांनी केले आहे. गोदावरी अर्बन बँक ग्राहकांना सर्वोतोपरी सेवा देण्यास कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या महागाव तालुक्यातील कोठारी येथिल प्रणिता काळे यांचा विशेष सत्कार गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदरील मेळाव्याला कीर्तीका कदम, गणेश कांन्नव, योगेश गिरी, राजाराम रनमले, गजानन गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभाले आहे.
यावेळी चितांगराव कदम, नितीन भुतडा, सविताताई कदम, निधीताई भुतडा, कृपासागर हरडपकर, ओमप्रकाश सारडा, संदीप ठाकरे, प्रकाश गादेवार, कविता मारोडकर, सविता पाचकोरे, सुनिता देशमुख, किर्तीका कदम, गोदावरी अर्बन बँकेचे यवतमाळ शाखा वरिष्ठ व्यवस्थापक रवि इंगळे, मार्केटिंग व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखा व्यवस्थापक धनंजय क्षिरसागर, गणेश शिंदे, यासह विवीध बचत गटातील महिलांची , बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय क्षिरसागर यांनी केले. सूत्र संचालन महेश गिरी, विद्यानंद जाधव यांनी तर आभार प्रदर्शन राहुल देशमुख यांनी मानले.