निवडणूक निरीक्षक कमलदीप सिंग यांनी घेतला आढावा

शेख मुजाहिद
सहसंपादक 7798306192
उमरखेड, दि 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ हे आदर्श संहिता मतदार संघात लागू झाली असून, लवकरच नामनिर्देशन पत्रे ही उमेदवाराकडून दाखल केली जातील. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबी बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक कमलदीप सिंग यांनी पथक प्रमुखांच्या आयोजित आढावा बैठकीत दिल्या.

हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत खर्च निरीक्षक कमलदीप सिंग यांनी सर्व पथक प्रमुखांचा आढावा घेतला. कमलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार उमरखेड यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
सभेमध्ये एमसीसी, व्हीव्हीटी, एसएसटी, एफएसटी यांची नोडल अधिकाऱ्यास टीम निवडणूक खर्च व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत विचारणा केली. जेणे करून राजकीय पक्ष, रॅली, बैठका,

मेळावे, खर्चावर देखरेख राजकीय पक्षांना नोटीस व्हिडिओ चित्रीकरण तपासणी सर्व लेखे अद्यावत ठेवणे बाबत सूचित केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भरारी पथक, स्थिर नियंत्रण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, उमेदवार खर्च पथक यांच्यावर सनियंत्रण ठेवून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
या पथकातील सर्व नोडल अधिकारी यांच्याकडे असलेल्या कामाचा आढावा तसेच व्हिडिओ चित्रीकरण यांचे कात्रण तसेच खर्चाचे रजिस्टर यामधील खात्री केली. सर्व पथकप्रमुखांनी संघभावनेने काम करण्याचे सूचित केले.