ढाणकीत उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या न.पं.च्या पाणीपुरवठा अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करा.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
ढाणकीची पाणी समस्या आहे जुनी असून नगरपंचायत झाल्यानंतरही पाणी समस्या जैसे थे चं आहे. पानी समस्येसाठी गावकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. परंतु पाणी समस्या काय नाही भेटली.सद्यस्थितीत ढाणकी शहरातील नळांना होणारा पाणीपुरवठा जवळपास ३० ते ३५ दिवसाआड होत असून यास जबाबदार कोण ? दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, त्यासाठी पूर्व प्लॅनिंग करून नगरपंचायतने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे असताना, तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे काम नगरपंचायत प्रशासन करीत असल्याचा आरोप, आजाद समाज पार्टीने केला आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नगरपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. ढाणकी ते गांजेगाव पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम उन्हाळा लागण्यापूर्वी करणे आवश्यक असताना, पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजेच मे महिन्यात सुरू करण्यात आले. नगरपंचायतच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ढाणकीवासियांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पाणीपुरवठा अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच नगरपंचायत स्थित

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करून तात्काळ सुरू करण्यात यावे. पूर्णवेळ मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता यांची नियुक्ती करण्यात यावी, रिक्त पदाचा तात्काळ भरणा करण्यात यावा, शहरात सध्या दोन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, टँकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा करण्यात यावा. वरील लोकहिताच्या मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्या. जर १५ दिवसाच्या आत सदर मागण्या मंजूर न झाल्यास गांजेगाव येथील पैनगंगा नदीत आजाद समाज पार्टी तर्फे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा, निवेदनाच्या माध्यमातून आजाद समाज पार्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिला आहे.
याप्रसंगी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, जिल्हा महासचिव,संतोष जोगदंडे, तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव, ॲड.पंजाबराव नवसागरे, प्रा. गजानन दामोदरे, एड इमरान खान ,राहुल धुळधुळे यासह आजाद समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.