वाढदिवसाचा उत्सव समाजसेवेत!
शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न व वॉटर बॅगचे वाटप

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
उमरखेड : वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत उमरखेड शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबविला. स्थानिक शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालयाला भेट देत तेथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न पदार्थ तसेच वॉटर बॅगचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील विशेष मुलांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. खाऊचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंदाचे वातावरण यामुळे कार्यक्रमाला आपुलकीची किनार लाभली.
या उपक्रमात शिवसेना महिला शहरप्रमुख सपना चौधरी, उपशहरप्रमुख सारिका कोकांडे, मंजुषा नरवाडे, माया पवार, शारदाताई जाधव, महिला संघटक संगीताताई धाबे यांच्यासह उपशहरप्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, शिवचरण वंचेवाड, विनायक पोहरकर, साई जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिष्टान्न पदार्थांचा आनंद घेतला. वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटण्याची संधी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



