जनुना शेतशिवारात गांजाची २२ झाडे जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एकाविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे जनुना येथील शेतशिवारात गांजा अंमली पदार्थाची झाडे लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत गांजाची एकूण २२ झाडे, अंदाजे किंमत २४ हजार रुपये, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली असून, संतोष किसन लोहटे (वय ३५, रा. जनुना, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे इसम, गुंगीकारक व अंमली पदार्थांची तस्करी तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी अधिनस्थ पथकांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुप्त माहितीवरून थेट शेतात छापा
दरम्यान, २४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ कॅम्प पुसद येथे असताना गुप्त बातमीदारामार्फत जनुना शेतशिवारातील एका शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पंचांसह जनुना शेतशिवार गाठले.
तेथे संशयित संतोष किसन लोहटे याच्या ताब्यातील शेताची पाहणी केली असता गांजा अंमली पदार्थाची २२ झाडे लागवड केलेली आढळून आली. पंचांसमक्ष सदर झाडे व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली औषधी व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(ब) व २०(अ)(i) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध अंमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळकडून जिल्ह्यातील अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रसाठा तसेच अंमली व गुंगीकारक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे. अशा प्रकारची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (म.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद अमर मोहिते (म.पो.से.) तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनील पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे व चापोशि राजेश जाधव, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सहभाग घेतला.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



