Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

मंत्री महोदय पोहोचले मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर!
दुष्काळग्रस्त भागाची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून पाहणी
पीक नुकसान भरपाई, दुष्काळी मदत व पाणी-चाऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा आक्रोश; शासनस्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : काळी दौलतखान सर्कलमधील कोनदरी, कासोळा व काळी दौ. परिसरात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी गुरुवारी शेतशिवारात जाऊन पाहणी केली.
पावसाअभावी सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठे नुकसान, नदी-नाले व तलाव कोरडे पडल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, तसेच शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत व पीक नुकसानभरपाई मिळावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी राज्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संबंधित प्रशासनाने शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी एकले, गटविकास अधिकारी चव्हाण, विस्तार अधिकारी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी भवरे, महावितरण अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button