महागाव तालुक्यात गांजा विक्रीवर एलसीबीची कारवाई; दोघांना अटक, १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील घोणसरा–मोहदी मार्गावर गांजा विक्री करताना स्थानिक गुन्हा शाखा (एलसीबी) पुसद यांनी १७ जानेवारी रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत अमरसिंग कचरू जाधव व शंकर देवराव खोकले (दोघेही रा. आमणी खुर्द, ता. महागाव) यांना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी, काळे दौलत परिसरात यापूर्वीही गांजा पेरणी व तस्करीची प्रकरणे उघडकीस आली असून, हा परिसर गांजा रॅकेटसाठी संवेदनशील बनत चालल्याचे चित्र आहे. विशेषतः युवा पिढीत गांजाचा सर्रास वापर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून, व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी भरकटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या कारवाईमुळे महागाव तालुक्यात कार्यरत असलेल्या मोठ्या गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलीस यंत्रणेकडून पुढील तपास जोरात सुरू



