Uncategorized

प्रत्येक गावात पक्षाचे बुथ आवश्यक – डी. के. दामोधर


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
वंचित बहुजन आघाडी महागाव तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक यवतमाळ जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष अंकुश कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, महागाव येथे पार पडली.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, मा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजातदादा आंबेडकर तसेच नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने, प्रत्येक गावात पक्षाचे बुथ उभारणे व शाखा फलक लावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी केले. तसेच प्रत्येक पंचायत समिती गणाच्या मजबूत बांधणीसाठी काही पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या त्याग, संघर्ष व विचारधारेचा वारसा पुढे नेत, तालुक्यातील वंचित, शोषित आणि सत्तेपासून वंचित असलेल्या सर्व समाजघटकांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत येऊन संघटितपणे काम करावे, असे आवाहन दामोधर यांनी केले. यासाठी तालुका कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पक्षाची मजबुतीकरण मोहीम राबवावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई भवरे, देवराव हरणे, गुणानंद मानकर, विलास पाईकराव, देवानंद खिल्लारे, नामदेवराव लहाने, पप्पू कावळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजू नरवाडे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button