Uncategorized
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

मुख्य संपादक
नागपूर दि. ११ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते.
नागपूर विमानतळावर त्यांचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी मंत्री दीपक सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी रामटेक येथील गड मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या नेहरू मैदानावरील शिवसंकल्प अभियान या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.रात्री उशिरा ते मुंबईकडे प्रयाण करतील.



