शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन मार्फत रूट मार्च

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत शहरात आज दिनाक ०६ फेब्रुवारी रोजी चे १२:००ते ०२:०० वा दरम्यान आगामी लोकसभा ,विधानसभा निवडणूक, संत श्री सेवालाल महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवनियुक्त उप विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब यांचें उपस्थितीत व अखिलेश कुमार सिंग डेप्युट कॅमांडन, अभिषेक कुमार यादव असिस्टंट कॅमांडन (केंद्रीय रॅपिड फोर्स ), यांचें उपस्थितीत पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती विसर्जन मार्ग मिश्र वस्ती व संवेदनशील ठिकाणीचे मार्ग गाधी चौक, खडकपुरा, हुतात्मा चौक, अबरार चौक, जामा मजित, मक्का मजीत, बसवेश्वर मंदिर, ताजपुरा वाचनालय, मौला अली चौक, नाग चौक, गायत्री चौक, शिवाजी चौक परत पोलीस स्टेशन पर्यंत रूट मार्च काढण्यात आले.सदर रूट मार्च करीता केंद्रीय रॅपिड फोर्स ६० कर्मचारी ,RCP पथक उमरखेड व यवतमाळ पो स्टे येथील २० अमलदार रूटमार्च करीता हजर होते.