Uncategorized

ईसापुर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी थेट रस्त्याच्या बांधकामाला उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अधिकारी कंत्राट दारावर दंडात्मक कार्यवाही करतील काय?

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

ईसापुर धरणाच्या डाव्या कालव्यामार्फत शेत सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अनाधिकृतपणे ढाणकी- सावळेश्वर रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराकडून वापर करण्यात येत असल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला असून याबाबतीत उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग उमरखेड संबंधित कंत्राटदारावर कोणती दंडात्मक कार्यवाही करतात याकडे जनसामान्याचे लक्ष लागले असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे या कालव्यावर देखरेख ठेवणारा कर्मचारी कंत्राट दारावर का मेहरबान आहे की यात काही आर्थिक देवाणघेवाण आहे या बाबीची उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे दिसत आहे तसेच शेती सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पानिपट्टी वसुलीसाठी तगादा लावणारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग उमरखेडचे कर्मचारी अनाधिकृतपणे व बेकायदेशीर कालव्याचे पाणी उपसणाऱ्या कंत्राटदाराला दिवसाढवळ्या पाणी उपसा करण्यास का सूट देत आहेत यात काही काळे बेरे तर नाही ना असा संशय सर्वसामान्यातून व्यक्त केल्या जात आहे …( चौकट). ढाणकी सावळेश्वर रस्त्याचे काम फुकटचे पाणी वापरून करणाऱ्या कंत्राट दारावर रस्ते बांधकाम विभाग विविध बाबतीत मेहरबान असून मागील कित्येक दिवसापासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे सावळेश्वर वाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यातच सदर कंत्राटदाराकडून रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट मुरूम निकृष्ट दगड इत्यादी निकृष्ट साहित्याचा सर्रासपणे वापर केल्या जात आहे त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याकडे देखील संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याच्या कामासाठी फुकटचे पाणी वापरणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी जनसामान्यातून होत असल्याचे पुढे येत आहे सोबत फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!