गो. सी. गावंडे महाविद्यालयात स्नेहसंमेलन “कलाविष्कार-2024”

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड, (दि. 18 जानेवारी)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात 20 जानेवारी 2024 रोजी “कलाविष्कार-2024” स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे, यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक मा. श्री. जॉनी लिव्हर जुनियर मुंबई हे राहतील व त्यांच्या हास्यविनोदांच्या कार्यक्रमाची मजा विद्यार्थी घेतील, त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम जसे आनंद मेळावा, निबंध स्पर्धा वकृत्व, स्पर्धा रांगोळी, मेहंदी, डिश डेकोरेशन स्पर्धा भावगीत व फिल्मी गीत त्याचबरोबर समूह गीत व संगीत फिश पौंड चे आयोजन करण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे जसे क्रिकेट सामने, चेस इत्यादी, दुसऱ्या दिवशी लोकनृत्य व एकल नृत्य स्पर्धा व शेवटी बक्षीस वितरण समारोप व शेलापागोटे हा कार्यक्रम आयोजित केला आहे .
स्नेहसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव माननीय डॉ. या.मा राऊत हे राहतील व माननीय श्री राम देवसरकर, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. माधवराव बा कदम यांनी दिली आहे.