Uncategorized
आज दिनांक 26जानेवारी 2024रोजी जि. प. शाळा नागेशवाडी येथे ठिक.7.30. वाजता ध्वजारोहणाचा आज कार्यक्रम पार पडला

प्रतिनिधी (ग्रामीण ) :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877
दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जि प. शाळा नागेशवाडी येथे सकाळी ठीक 7.30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. शेवटी सर्व मुले, शिक्षक, व गावकरी मंडळी शाळेच्या पटांगणावर एकत्र जमली व ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री पी. एन. गोंड सरांनी प्रास्ताविक केले तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिक्षणप्रेमी श्री विलास तुळशीराम राठोड यांच्या हस्ते वही व पेन चे वाटप करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना गोळी व चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.