बाळदी येथे अखंड हरिनाम सप्ताह समारोप उत्साहात

अतिश वटाणे प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाला ह. भ.प. प्रभु महाराज शोभणीकर, ह. भ. प.मुक्तादीदी (पंढरपूर) ,ह. भ.प. संतोष महाराज पळसोनीकर गायन सम्राट),ह.भ.प.जनाबाई डोंगरे (रिसोड ),ह. भ. प. नम्रता ताई चव्हाण(यवतमाळ) ,ह. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील (ठाणे), ह. भ. प. प्रवीण महाराज (पुसद )आणि ह भ प भीमराव महाराज साठे इत्यादी कीर्तनकार लाभले होते.त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कीर्तनातून गावातील जनतेला असा उत्कृष्ट संदेश दिला. महाराष्ट्राला एवढा मोठा वारकरी संप्रदाय लागला हे आपल्यासाठी सर्वात भाग्याची गोष्ट आहे व दैनंदिन जीवन जगत असताना माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे हे त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकांना समजावून सांगितले. या कीर्तनाच्या कार्यक्रमामुळे गावामध्ये एक वेगळलेच वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान पालखी काढण्यात आली होती. या पालखीला गावातील महिला व पुरुष उपस्थित होते तसेच या सात ते आठ दिवसाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.या कार्यक्रमाला गावातील व तांड्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी महिला मंडळ पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व गावकऱ्यांना भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मेहनत करून हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला. त्या पुढार्याचं सर्व गावभर कौतुक केले जात आहे.