शहर

महागाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात बुधवारी गुरुउत्सव; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

महागावप्रतिनिधी संजय नागरगोजे

गुरुपौर्णिमेनिमित्त महागाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र, दिंडोरी प्रणित, संदेशनगर, पुसद रोड येथे बुधवार, २९ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुउत्सव व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता भूपाळी व आरतीने होणार असून त्यानंतर गुरुमाऊलींचा अभिषेक करण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता सर्व स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना ‘गुरूपद’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता महानैवेद्य व महाआरती होईल.

कार्यक्रमानंतर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित या धार्मिक सोहळ्यात परिसरातील सर्व भाविक, सेवेकरी आणि श्रद्धाळूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र, दिंडोरी प्रणित, संदेशनगर, पुसद रोड, महागाव येथील सेवेकरी मंडळाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button