Uncategorized

हिंदूराष्ट्र जागृती सभा रद्द करून, शहरात लागलेले बॅनर त्वरित हटविण्यात यावे

(भीम आर्मी सामाजिक संघटनेचे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन)

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

पुसद येथे दि. 18 जानेवारी 2024 रोजी होत असलेली हिंदू राष्ट्र जागृती सभा रद्द करून शहरात लागलेले बॅनर त्वरित हटवण्यात यावे या मागणीचे निवेदन 16 जानेवारी 2024 रोजी पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन पुसद यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आले आहे.

भारत देशात सध्या भारतीय राज्यघटना लागू आहे.

या संविधानानुसार सर्वच जाती धर्माचे पंताचे नागरिक मागील स्वातंत्र्यापासून जवळपास 70 वर्षापासून अखंडपणे या देशात राहतात आजच्या संविधानानुसार कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार करता येणार नसून धर्मनिरपेक्ष असलेली भारतीय राज्यघटना अमलात आलेली आहे त्यामुळे भारतीय संविधानानुसार प्रत्येक धर्माला सारखेच महत्त्व आहे.

एका कोणत्याही धर्माचा पुरस्कार करता येणार नाही त्यामुळे
हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यास काही हरकत नाही परंतु कोणी हिंदूराष्ट्र जागृतीच्या नावाखाली या देशाला हिंदू राष्ट्र म्हणत असेल तर ते आजच्या संविधानानुसार गैरसविधानिक आहे.

त्यामुळेच पुसद शहरांमध्ये
“हिंदु राष्ट्र जागृती सभा” या होत असलेल्या कार्यक्रमा मध्ये हिंदुराष्ट्र हा शब्दच असंविधानिक आहे तथापी या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतर धर्मीयामध्ये देष पसरविने व त्यांचे डोके भडकवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातुन सतत होताना दिसत आहे.

पुसद शहरातील मागचा इतिहास बघता कायदा व सुव्यवयोचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या मुळे “हिंदुराष्ट्र जागृती सभा’ सभा रद्द करून लावलेले बॅनर हटविण्यात यावे, अन्यथा, भीम आर्मी सामाजिक संघटना संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही होणाऱ्या दुष्परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी अशा विषयाचे निवेदन पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे, अशी माहिती भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!