शहर

माजी गृहमंत्री पोहोचले आत्महत्याग्रस्तांच्या दारी(अभय मस्के तहसीलदार यांची जिल्हाधिकाऱ्याकडे माजी गृहमंत्र्याची फोन द्वारे तक्रार)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दहिसावळी येथे दिनांक 21 9 2025 रोजी विपुल घोरपडे या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती त्याची शाही वाळते न वाळते 24 9 25 रोजी नामदेव बाबाराव बावणे या शेतकऱ्याने घरामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली या सर्व परिसरामध्ये सर्व शेत पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे व अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे शेतीवर बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली या घटनेची दखल घेऊन माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 27 -9- 2025 रोजी दहिसावळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या परिवारांना दिलासा दिला व शासनाची मदत ताबडतोब कशी मिळेल याची सुद्धा विचारपूस जिल्हाधिकाऱ्याला केली व महागाव चे तहसीलदार मंडल अधिकारी कृषी अधिकारी यांनी आत्महत्याग्रस्त गावांमध्ये भेट न दिल्यामुळे त्यांची थेट तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून हा गंभीर विषय असल्यामुळे अधिवेशनात मुख्यमंत्र्याला जाब विचारू तसेच ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार रुपयाची तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी जवळ दिली परंतु प्रशासनाला व महागाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीला तसेच तहसीलदार यांनी साधी गावांमध्ये जाऊन विचारपूस सुद्धा केली नाही आत्महत्या करण्याचे सत्र सुरू असताना हा विषय चिंतेचा विषय असून प्रशासन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे .पटवारी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी यांचे अकार्यक्षम असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने महागाव तालुक्यात जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या तसे लोकप्रतिनिधी उमरखेड महागाव मतदार संघाचे आमदार किसन वानखेडे यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी साधी भेट सुद्धा देऊ शकत नाही ते शासनाकडे कोणता पाठपुरावा करणार महागाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी महागाव तालुक्यातील जनतेने निवडून दिलेले आमदार व खासदार हे हार तुरे घेण्यात व्यस्त दिसत आहेत. त्यामुळे महागाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होण्याची वेळ आता आली आहे. आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिलबाबू देशमुख यांच्या महागाव तालुक्याच्या दौऱ्यामध्ये अफजल फारुकी प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष स्वप्निल अडकिने तालुका अध्यक्ष राजू भैया जयस्वाल विधानसभा अध्यक्ष भास्कर पंडागळे तसेच बाबासाहेब गाडे पाटील प्रदीप पाटील देवसरकर व संकेत पुणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button