Uncategorized

तंट्या मामा भिल्ल बचत गट प्रकाशित दिंनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा संपन्न

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


उमरखेड:- तंट्या मामा भिल्ल बचत गट नांदेड यवतमाळ प्रकाशित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दिनांक २४ डिसेंबर रोजी लक्ष्मी कॉम्प्युटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा लुप्त होत चाललेली आहे. ती जतन करणे आदिवासी क्रांतिकारकांचे थोडक्यात इतिहास,जयंती, स्मृतीदिन, आदिवासी सण व आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय योजनाविषयक माहीती युवक समाज बांधव यांना माहीत व्हावे या उद्देशाने सण २०१९ पासून तंट्या मामा भिल्ल बचत गट नांदेड यवतमाळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही पाचव्या वर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.सादर सोहळ्याचे अध्यक्ष भिल्ल नाईकडा आदिवासीं सेवा संघटना चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक नारायणजी पिलवंड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून
डी.बी.अंबुरे राज्य उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल महा.,कोंडीबा कोरटवाड मुख्याध्यापक परळी,देवराव पेजेवाड सेवानिवृत्त मुख्याध्यापक, माधवराव पिलवंड संचालक खरेदी विक्री संघ उमरखेड,मारोतराव पिलवंड सरपंच सोनदाभी,देवराव लांडगेवाड सेवानिवृत्त वनविभाग कर्मचारी,अर्चना बेडारे मा.सरपंच आष्टा, दत्तात्रय मित्तकवाड अध्यक्ष तंट्या भिल्ल बचत गट आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये आदिवासीं समाजासाठी सातत्याने २८ वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन काम करणारे नारायणजी पिलवंड,आदिवासीं विध्यार्थी यांना शेक्षणीक जागृती निर्माण व्हावी त्यांच्या कर्तृत्वाला शाबासीची थाप पाठीवर असावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणारे गंगाधर बेलुरकर सर,खरेदी विक्री संघ संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल माधवराव पिलवंड, बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी नवनियुक्त निलेश पिलवंड अशा आदिवासीं समाजातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा सत्कार आयोजकांन मार्फत करण्यात आला.
कार्यक्रमास डी.बी. अंबुरे राज्य उपाध्यक्ष बिकेडी महा., देवराव पेजेवाड सेवानिवृत्त मुख्याध्यापक, निलेश पिलवंड यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष बिकेडी व राजू पेदेवाड युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अभिलाश पेजेवाड ,गजानन पिटलेवाड,राजेश पिलवंड, दिपक गादेवाड यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर मित्तकवाड यांनी केले तर गजानन लव्हाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!