Uncategorized

सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या डी.एस.सी. चे अधिकार बंद करा

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

दिनांक २२/१२/२०२३
सरपंच आणि ग्रामसेवक हे गाव विकासाच्या कामामध्ये ठेकेदाराकडून कमिशन मागणी करीत असल्याने त्यांच्याकडील डी. एस.सी. जमा करून घेऊन ते अधिकार पंचायत समिती स्तरावरील २ अधिकारी व संबंधित गावातील एक नागरिक यांना देण्याबाबत दिनांक २२/१२/२०२३ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना दिगंबर गणेशराव कदम आणि शेख इरफान शेख ईसा यांनी निवेदन दिले.
सरकारकडून गाव विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून गावोगावी लाखो रुपयांचा निधी दिला जातो. तो निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करताना त्या कामाचे निविदा लावणे व देयके काढण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांना अधिकार दिलेले आहेत त्याचा गैरफायदा घेऊन ग्रामसेवक, सरपंच संबंधित ठेकेदाराकडून ५ टक्के, ७ टक्के,१० टक्के कमिशन घेत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे संबंधित ठेकेदार हे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे करीत आहेत. त्यामुळे सरकारच्या उद्देशानुसार गावाचा विकास पाहिजे तसा होत नाही तर सरपंच आणि ग्रामसेवक यांचाच भरभरून विकास होत आहे. खऱ्या अर्थाने गावासाठी दिलेला निधी त्या कामावर परिपूर्णपणे खर्च होऊन दर्जेदार कामे करायची असल्यास सरपंच सचिव यांचे कडून होणारा भ्रष्टाचार कायमस्वरूपी बंद करावा लागेल आणि त्यासाठी त्यांना निविदा लावण्याचे व बिले काढण्यासाठी दिले गेलेले डी .एस.सी.चेअधिकार त्यांच्याकडून काढून घेऊन या कामात पारदर्शकता येण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील दोन किंवा तीन अधिकारी व सोबत त्या त्या गावातील एक समाजसेवक यांना संयुक्तिकरित्या निविदा लावण्याचे व बिल काढण्याचे अधिकार देण्यात यावेत या करिता दिगंबर गणेशराव कदम रा. कोप्रा (बु.), आणि शेख इरफान शेख ईसा रा. उमरखेड यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे याबाबतीत संबंधितांकडून काय कार्यवाही केले जाते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!