उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या निधनामुळे हिमायतनगर उद्या ‘कडकडीत बंद’

‘
(तालुका प्रतिनिधी शेख खयुम कुरेशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हिमायतनगर शहरातील बाजारपेठ एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सुपूर्द केले. या निवेदनाद्वारे, अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने एक दिवस बंद ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी अमोल धुमाळे (रा.शहर अध्यक्ष), विजय शेळगावकर, शे. माजिद कुरेशी, अंबादास बोकवाड, अभिलाष जयस्वाल, ज्ञानेश्वर कोरे, सदाशिव काळे, शे. अफरोज विरसाणीकर,राहुल नरवाडे आणि माजी उपनगराध्यक्ष मो.जावेद हाजी अ.गणि यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने या आवाहनानुसार शहरात शांतता राखण्यासाठी योग्य सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.



