सामाजिक

काँग्रेसकडून संधी मिळाल्यास मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्यास कटिबद्ध राहीन – अंबादास धुळे

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या विधानसभा
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी योग्य तो
उमेदवार मिळावा यासाठी मतदार संघामध्ये
चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी
मतदार संघामध्ये फिरून जनतेच्या मनातल्या योग्य
त्या उमेदवाराच्या शोधात आहेत. लोकसभा
निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त
यश मिळाल्याने होऊ घातलेल्या विधानसभा
निवडणूकी मध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष ताकतीने
लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उमरखेड
मतदार संघामध्ये पक्षश्रेष्ठी नवीन चेहऱ्याच्या शोधात
असल्याचे चर्चा आहे. जर पक्षश्रेष्ठीने संधी दिल्यास
अंबादास धुळे हे उमरखेड महागाव विधानसभेसाठी
नवीन चेहरा ठरू शकतात. त्यांची ग्रामीण जनतेशी
नाळ जुळालेली असून ग्रामीण भागातून ते आलेले
असल्याने गावातील परिस्थितीची त्यांना चांगली
जाण आहे. तरोडा तालुका उमरखेड जिल्हा
यवतमाळ हे त्यांचे जन्मगाव आहे. सामाजिक,
धार्मिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये ते आजपर्यंत
आपले योगदान देत आले असल्याने उमरखेड
महागाव मतदार संघामध्ये त्यांचा एक मोठा चाहता
वर्ग आहे. तसेच ते सर्व परिचित आहेत. या वेळेस
काँग्रेस हा नवा चेहरा शोधतच असल्याने अंबादास
धुळे यांचा पक्षाने विचार करावा अशी मागणी
सर्वसामान्य नागरिकांची आहे. विशेष म्हणजे
अंबादास धुळे हा असा एक चेहरा आहे की, त्यांना
स्थानिक नेत्यांचे सुद्धा सहकार्य आणि पाठिंबा
असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या मराठा आरक्षणाच्या
आंदोलनामध्ये अंबादास धुळे यांनी हिरारीने भाग
घेतला होता. आणि सरकार विरोधात मराठा
आरक्षणासाठी कॉर्नर सभा घेऊन जनजागृती केली
होती. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी भेटी
घेऊन मराठा आंदोलनासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न
केले होते. विधानसभा मतदारसंघातील मराठा
मतदार हे कधीच विसरणार नाहीत. कोरोना
काळामध्ये त्यांनी सर्व सामान्य जनतेसाठी केलेले
कार्य उल्लेखनीय आहे. तसेच काँग्रेस पक्ष वाढीसाठी
त्यांनी कार्यकर्ता मेळावा तसेच इतर माध्यमातून
प्रयत्न केलेले असल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची
नक्कीच दखल घेऊन त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार घोषित करेल.
असे ग्रामीण भागातील जनतेची अपेक्षा आहे.

           चौकट 

“ काल यवतमाळ येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवारालाच पक्षाचे तिकीट मिळावे अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी कुणाल चौधरी यांना केली. यावेळी एका उमेदवाराच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याची ही चर्चा आहे. पक्षाचे तिकीट कोणाला मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात असून अंबादास धुळे यांना तिकीट मिळायला हवे असे कार्यकर्त्यांचे मत आहे. “

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!