शहर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सात बारा रोजी उमरखेड येथे भव्य सभा

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्र भर दौरा करत असून 7 डिसेंम्बर रोजी उमरखेड जि.यवतमाळ येथील गो.सि.गावंडे महाविद्यालय येथील  मैदानात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी(कुणबी)प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाकडे 24डिसेंम्बर पर्यंतचा अवधी दिला असून उपोषणानंतर काही दिवसच रुग्णालयातील उपचारानंतर पुन्हा मराठा समाजाला प्रबोधन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्र भर दौरा चालू केला आहे.
जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा चौथा टप्या हा 1 डिसेंम्बर पासून सुरू होत असून यामध्ये मराठवाडा व विदर्भाचा समावेश आहे.
विदर्भातील वारकऱ्यांची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव ला 4डिसेंबर रोजी तर 6 डिसेंबर ला शक्तीपीठ श्रीक्षेत्र माहूरगड रेणुकामातेच्या दर्शनाला ते जाणार आहेत.
यानंतर दिनांक 7डिसेंबर ला सकाळी ठीक 10वाजता उमरखेड येथील गो.सि.गावंडे महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची भव्य सभा होणार असून यामधून जरांगे पाटील सकल मराठा समाजाला प्रबोधन करणार आहेत. सदरील सभेच्या यशस्वीतेसाठी उमरखेड तालुक्यातील सर्व गावातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे यासाठी 27ऑक्टोबर रोजी दुपारी 1वाजता सकल मराठा समाज बांधवानी बैठक आयोजन करून सभेच्या पूर्वतयारी बाबत चर्चा केली व लवकरच दुसरी बैठक घेऊन विविध समित्या व स्वयंसेवक नियुक्ती करून सभेत कोणतेही गैरसोय होणार नाही याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहे.
पश्चिम विदर्भातील उमरखेड तालुका हा मुख्य केंद्र असून मराठा आरक्षण मागणी संदर्भात विविध आक्रमक आंदोलन, उपोषण,तीव्र निदर्शने, गावोगावी नेते बंदी करण्यात उमरखेड तालुका अग्रेसर आहे येथील सभेला उमरखेड,पुसद,दिग्रस,दारव्हा,महागाव,आर्णी, हदगाव,हिमायतनगर,माहूर,किनवट या आठ तालुक्यातील सकल मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार अशी माहिती आहे. या सभेसाठी शहर तसेच तालुक्यातील गावोगावी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे होर्डिंग बॅनर लागत आहेत.

या सभेच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा बांधव उमरखेड तालुका व शहर कार्य करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!